परीक्षा तारीख: 11 जून 2026 | गट अ | एकत्रित चाळणी परीक्षा

MPSC कडून महत्त्वाची घोषणा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) 6 मे 2026 रोजी एक अधिकृत प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. यामध्ये महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा गट-अ अंतर्गत दोन महत्त्वाच्या पदांसाठी सामायक चाळणी परीक्षा (Common Screening Test) आयोजित करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

MPSC 2026: पशुधन विकास अधिकारी व सहायक आयुक्त पशुसंवर्धन परीक्षा

MPSC 2026 कोणत्या पदांसाठी परीक्षा होणार?

अनु. क्र.पदसेवाजागा
1पशुधन विकास अधिकारीमहाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा गट-अ2,795
2सहायक आयुक्त पशुसंवर्धनमहाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा गट-अ308

या दोन्ही पदांसाठी एकच सामायक चाळणी परीक्षा घेण्यात येणार आहे, कारण दोन्हींचा अभ्यासक्रम समान आहे.

परीक्षेचे वेळापत्रक व केंद्रे

परीक्षा तारीख: 11 जून 2026
वेळ: सायंकाळी 4:30 ते 7:00 (संध्याकाळच्या सत्रात)
परीक्षा केंद्रे:
  • मुंबई
  • छत्रपती संभाजीनगर
  • नागपूर

MPSC सामायक चाळणी परीक्षा म्हणजे काय?

दोन्ही संवर्गांसाठी (पशुधन विकास अधिकारी आणि सहायक आयुक्त पशुसंवर्धन) एकच कॉमन परीक्षा घेण्यात येईल. परीक्षेनंतर:

  1. स्वतंत्र गुणवत्ता यादी प्रत्येक संवर्गासाठी वेगळी जाहीर केली जाईल.
  2. मुलाखत (Interview) - गुणवत्ता यादीनुसार पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल.
  3. अभ्यासक्रम व निवड प्रक्रिया MPSC च्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे.

MPSC परीक्षा का होणार आहे?

मूळ जाहिरातीनुसार, अर्जांची संख्या कमी असल्यास थेट मुलाखत घेण्याचा पर्यायही होता. मात्र, दोन्ही पदांसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज प्राप्त झाल्याने MPSC ने चाळणी परीक्षा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना:

  • ज्यांनी या दोन्हींपैकी कोणत्याही पदासाठी अर्ज केला आहे त्यांना एकाच परीक्षेला बसावे लागेल.
  • अभ्यासक्रम MPSC च्या अधिकृत वेबसाइटवर तपासणे आवश्यक आहे.
  • परीक्षेला 11 जून 2026 ही अंतिम तारीख असल्याने उर्वरित वेळाचा सदुपयोग करून Revision पूर्ण करावी.
  • Hall Ticket व इतर अपडेटसाठी MPSC च्या अधिकृत वेबसाइट mpsc.gov.in नियमित तपासत राहा.

निष्कर्ष 

MPSC ने जाहीर केलेली पशुधन विकास अधिकारी व सहायक आयुक्त पशुसंवर्धन भरती 2026 ही महाराष्ट्रातील सरकारी नोकरीच्या इच्छुक उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आहे. गट-अ दर्जाच्या एकूण 3,103 जागांसाठी 11 जून 2026 रोजी सामायक चाळणी परीक्षा होणार असून उर्वरित वेळाचा योग्य नियोजनाने उपयोग करा आणि परीक्षेची तयारी पूर्ण करा.

Read More










शिक्षकेतर कर्मचारी भरती 2026 | 30,000 पदांची मोठी भरती ?
MPSC Saralseva Pariksha 2026: Cadre Bucketing Policy म्हणजे नेमकं काय? उमेदवारांना कसा फायदा होणार?
भूमी अभिलेख विभाग New GR : 10683 Vacancies साठी आकृतीबंध मंजूर खरचं झाला का? पहा संपूर्ण माहिती
सरकारी नोकरभरती MPSC मार्फतच होणार- शासनाची मोठी घोषणा
केंद्रप्रमुख परीक्षा निकाल 2026 जाहीर! 38,558 उमेदवारांचा निकाल प्रसिद्ध – असा करा Result Check
Kolhapur Manapa भरती 2026 | IMP घोषणा रिक्त पदे भरणार
RTO AMVI जाहिरात ..MPSC चे Profile कसे बनवावे? कोणती कागदपत्रे लागतील? Form कोणाच्या नावाने भरावा? पहा संपूर्ण माहिती