नमस्कार मित्रांनो तुम्हां सर्वांचे स्वागत करतो दिव्यांग कल्याण विभाग अंतर्गत एक आकृतिबंध मंजूर करण्यात आला आहे, आणि हां जो आकृतीबंध आहे तर तो येणाऱ्या या कालावधीत आपल्याला जाहिराती स्वरूपामद्धे बघायला मिळणार आहे.  कुठल्याही विभागाचा आकृतीबंध मंजूर होतो तर त्याच्यानंतर बघितलं जातं त्या विभागात रिक्त पद किती आहेत, आणि रिक्त पद जास्त असतील तर लगेच त्या रिक्त पदांचा बिंदू नामावली निश्चित करून तो प्रस्ताव वित्त विभागाला पाठवला जातो आणि वित्त विभागाची मंजुरी मिळताच जाहिरात येते. 

Divyang Sakshamikaran Vibhag Bharti

Divyang Sakshamikaran Vibhag Bharti - नवीन आकृतीबंध व पदसंख्या माहिती

राज्य शासनाने दिव्यांग सक्षमीकरण विभागासाठी नवीन सुधारित आकृतीबंधाला मान्यता दिली आहे. आता या विभागाचे नाव अधिकृतपणे “दिव्यांग सक्षमीकरण विभाग” असे करण्यात आले आहे आणि या विभागाचे सचिव  IAS Tukaram Mundhe Sir आहेत. या विभागामध्ये एकूण 2105 पदांची स्ट्रेंथ मंजूर करण्यात आली आहे, म्हणजे एवढ्या संख्येने कर्मचारी या विभागात कार्य करू शकतात. 

 परिशिष्ट 1 मधील पदे

  1. 1458 नियमित पदे:- ही पूर्णपणे सरकारी नोकरीची पदे आहेत
  2. 647 बाह्य स्त्रोत पदे;- ही कॉन्ट्रॅक्ट बेसवरची पदे आहेत (सरकारी कायमस्वरूपी नोकरी नाही)
  3. 201 नव्याने निर्माण केलेली पदे:- ही पूर्णपणे नवीन (Fresh) पदे असून याआधी भरलेली नाहीत
Divyang Sakshamikaran Vibhag Bharti

Divyang Sakshamikaran Vibhag Bharti

Divyang Sakshamikaran Vibhag Bharti - मंत्रालयातील पदरचना आणि भरती प्रक्रिया

सुधारित आकृतीबंधानुसार विभागाची रचना स्पष्ट करण्यात आली असून, मंत्रालय स्तरावर (मुंबई) विविध गटांमध्ये पदे विभागली आहेत. मात्र, सर्व पदांसाठी एकाच वेळी मोठी भरती होईल असे नाही, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.

मंत्रालय स्तरावरील पदरचना
  • ही पदे प्रामुख्याने प्रमोशन किंवा राज्यसेवा परीक्षेद्वारे भरली जातात
  • काही अधिकारी थेट IAS स्तरावरून नियुक्त केले जातात

Group B (मुख्य भरती पदे)

या गटामध्ये प्रत्यक्ष भरती होणारी महत्त्वाची पदे आहेत:
  • कक्ष अधिकारी
सहाय्यक लेखाधिकारी – 38 पदे:- कॉमर्स विद्यार्थ्यांसाठी चांगली संधी

दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी
  • वेतन श्रेणी: S-17 (₹41,800 – ₹1,32,300)
  • एकूण पदे: 142

Group C (मोठ्या प्रमाणात पदे)

  1. कार्यालय अधीक्षक – 38 पदे
  2. सहाय्यक दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी – 309 पदे
  3. वरिष्ठ लिपिक (बहुतेक प्रमोशनने भरले जाते)
  4. कनिष्ठ लिपिक / लिपिक टंकलेखन :- ही पदे प्रामुख्याने MPSC Group C मार्फत भरली जातात

महत्त्वाची गोष्ट (जाहिरात कशी येते?)

  • एकूण पदसंख्या 2105 असली तरी सर्व पदांसाठी एकाच वेळी भरती होत नाही
  • उदाहरणार्थ: एखाद्या पदासाठी 439 जागा मंजूर असतील त्यापैकी 400 आधीच भरलेल्या असतील तर फक्त उर्वरित 39 रिक्त पदांसाठीच जाहिरात येईल.

म्हणजेच, जाहिरात नेहमी रिक्त पदांनुसारच येते, एकूण मंजूर पदांनुसार नाही

Divyang Sakshamikaran Vibhag Bharti  नवीन पदनिर्मिती आणि बदल

सुधारित आकृतीबंधामध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. काही पदे नव्याने तयार झाली आहेत, तर काही जुनी पदे रद्द करण्यात आली आहेत.



नव्याने निर्माण झालेली पदे

201 पदे पूर्णपणे नवीन (Fresh Posts) तयार करण्यात आली आहेत. ही पदे यापूर्वी कधीच भरलेली नव्हती जुन्या नावात बदल करून नवीन पद तयार:
  • दिव्यांग कल्याण अधिकारी (358 पदे - जुने)
  • दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी (144 पदे - नवीन)
  • या नवीन पदाला S-17 वेतन श्रेणी देण्यात आली आहे

आयुक्तालय (पुणे)

  • कनिष्ठ लिपिक – 88 पदे
  • सहाय्यक दिव्यांग सक्षमीकरण – 15 पदे

जिल्हा स्तर (महत्त्वाचे)

एकूण 1296 पदे

  • दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी – 144 पदे
  • सहाय्यक आयुक्त – 36 पदे
  • सहाय्यक दिव्यांग सक्षमीकरण – 288 पदे
  • कनिष्ठ लिपिक – 396 पदे

जिल्हा स्तरावर सर्वाधिक भरती होण्याची शक्यता

महामंडळ स्तर

  • कनिष्ठ लिपिक – 7 पदे
  • एकूण – 18 पदे

निष्कर्ष

दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या सुधारित आकृतीबंधामुळे मोठ्या प्रमाणावर पदनिर्मिती झाली असून, भविष्यात भरतीची मोठी संधी निर्माण झाली आहे. मात्र, सर्व पदांसाठी एकाच वेळी भरती होणार नसून रिक्त पदांनुसार टप्प्याटप्प्याने जाहिराती येणार आहेत. रोस्टर, बिंदूनामावली आणि वित्त विभागाची मंजुरी या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच भरती सुरू होईल. त्यामुळे उमेदवारांनी अधिकृत अपडेट्सवर लक्ष ठेवत आत्तापासूनच तयारी सुरू ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. योग्य वेळी योग्य तयारी असेल, तर ही संधी तुमच्या करिअरला नवा वेग देऊ शकते.

अशा महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे टेलिग्राम आणि व्हॉट्स अॅप चॅनल Join करा धन्यवाद. 

Join Whatsapp Channel                                                         Join Whatsapp Group



हे सुद्धा वाचा:- 



शिक्षकेतर कर्मचारी भरती 2026 | 30,000 पदांची मोठी भरती ?
MPSC Saralseva Pariksha 2026: Cadre Bucketing Policy म्हणजे नेमकं काय? उमेदवारांना कसा फायदा होणार?
भूमी अभिलेख विभाग New GR : 10683 Vacancies साठी आकृतीबंध मंजूर खरचं झाला का? पहा संपूर्ण माहिती
सरकारी नोकरभरती MPSC मार्फतच होणार- शासनाची मोठी घोषणा
केंद्रप्रमुख परीक्षा निकाल 2026 जाहीर! 38,558 उमेदवारांचा निकाल प्रसिद्ध – असा करा Result Check
Kolhapur Manapa भरती 2026 | IMP घोषणा रिक्त पदे भरणार
RTO AMVI जाहिरात ..MPSC चे Profile कसे बनवावे? कोणती कागदपत्रे लागतील? Form कोणाच्या नावाने भरावा? पहा संपूर्ण माहिती