नमस्कार मित्रांनो मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून एक नवीन पदासाठी सरकारी नोकरीची जाहिरात आलेली आहे आणि ही जाहिरात जो कोणी माजी सैनिक असेल त्यांच्यासाठी जाहीरात फार महत्त्वाची असणार आहे कारण या जाहिराती मध्ये फक्त जे माजी सैनिक आहेत ते या पदासाठी अप्लाय करू शकतात. लक्षात घ्या पदाचं नाव सागा आहे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी किंवा उपसंचालक गट म्हणजे ग्रुप ए ची पोस्ट आहे क्लास वन अधिकारी बनण्याची संधी असणार आहे जागा फक्त 21 आलेल्या आहेत. आता या पदाविषयीची संपूर्ण माहिती आपण या ब्लॉगपोस्टमध्ये बघणार आहोत.

Jilha Sainik Kalyan Adhikari 2026

Sainik Kalyan Vibhag Vacancy Update

जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी पदासाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध झाली असून ही भरती विशेषतः माजी सैनिकांसाठी आहे. या भरतीमध्ये एकूण 21 पदे उपलब्ध आहेत आणि विविध प्रवर्गानुसार जागांचे वाटप करण्यात आले आहे.

DOWNLOAD GR PDF - CLICK HERE

Sainik Kalyan Adhikari

पदांचा तपशील

  • एकूण पदे: 21
  • विविध प्रवर्गानुसार आरक्षण लागू

महत्त्वाच्या तारखा

  • अर्ज सुरू: 20 मार्च 2026
  • अर्जाची अंतिम तारीख: 9 एप्रिल 2026 (सायं. 5:45 पर्यंत)
  • परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख: 9 एप्रिल 2026
  • प्रवेशपत्र उपलब्ध: 13 एप्रिल 2026 पासून

वेतन

  • वेतन स्तर: S-23
  • वेतन श्रेणी: ₹67,700 – ₹2,08,700

पात्रता (महत्त्वाचे)

  • फक्त माजी सैनिक (Ex-Serviceman) अर्ज करू शकतात
  • उमेदवार सेवेत नसावा (Retired)
  • किमान Major रँक किंवा त्यापेक्षा उच्च पद आवश्यक
  • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक

Jilha Sainik Kalyan Adhikari 2026 - Who can apply

या भरतीसाठी पात्रतेबाबत एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतो. सुरुवातीला मेजर रँक आवश्यक असल्याचे सांगितले असले, तरी जर मेजर रँकचे अधिकारी उपलब्ध झाले नाहीत, तर लेफ्टनंट रँक आणि त्यापुढील अधिकारीही अर्ज करू शकतात.

म्हणजेच साध्या भाषेत:
लेफ्टनंट आणि त्यापेक्षा उच्च पदावरील सर्व माजी सैनिक अर्ज करण्यास पात्र आहेत.

पात्र पदे (Army, Navy, Air Force)

जर तुमची खालीलपैकी कोणतीही पोस्ट असेल, तर तुम्ही अर्ज करू शकता:

Indian Army

  1. Lieutenant
  2. Captain
  3. Major
  4. Lieutenant Colonel
  5. Colonel
  6. Brigadier
  7. Major General
  8. Lieutenant General
  9. General
  10. Field Marshal

Indian Navy

  1. Sub Lieutenant
  2. Lieutenant
  3. Lieutenant Commander
  4. Commander
  5. Captain
  6. Rear Admiral
  7. Vice Admiral
  8. Admiral

Indian Air Force

  1. Flying Officer
  2. Flight Lieutenant
  3. Squadron Leader
  4. Wing Commander
  5. Group Captain
  6. Air Commodore
  7. Air Vice Marshal
  8. Air Marshal
  9. Air Chief Marshal

जर तुम्ही वरीलपैकी कोणत्याही पदावर कार्य केले असेल, तर ही 21 पदांची संधी तुमच्यासाठी आहे.

Jilha Sainik Kalyan Adhikari 2026 - अर्ज प्रक्रिया आणि महत्त्वाच्या सूचना

या भरती संदर्भातील सर्व अपडेट्स तुम्हाला आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर तसेच नियमितपणे चॅनलवर पाहायला मिळतील. विशेषतः माजी सैनिकांसाठी येणाऱ्या जाहिराती अनेकदा लक्षात येत नाहीत, त्यामुळे अशा अपडेट्ससाठी चॅनल जॉईन करून ठेवणे फायदेशीर ठरेल.

अर्ज करताना लक्षात ठेवण्याच्या महत्त्वाच्या गोष्टी

  • EWS Certificate: 2025–26 किंवा 2026–27 या कोणत्याही वर्षाचे प्रमाणपत्र चालेल

  • Non-Creamy Layer (NCL): 2025–26 किंवा 2026–27 या वर्षातील वैध प्रमाणपत्र आवश्यक

  • परीक्षा शुल्क (Exam Fees):

    ₹719 (सामान्य)
    ₹449 (राखीव प्रवर्ग)

निष्कर्ष

एकूणच, ही भरती विशेषतः माजी सैनिकांसाठी एक उत्तम संधी आहे. मर्यादित जागा, चांगले वेतन आणि सोपी निवड प्रक्रिया यामुळे पात्र उमेदवारांनी ही संधी दवडू नये.

अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे जसे की EWS आणि NCL प्रमाणपत्रे योग्य वर्षाची असणे गरजेचे आहे. तसेच सर्व माहिती अचूक भरून वेळेत अर्ज करणे महत्त्वाचे आहे. योग्य माहिती, योग्य वेळ आणि योग्य तयारी असेल तर या भरतीत यश मिळवणे शक्य आहे.

अशा महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे टेलिग्राम आणि व्हॉट्स अॅप चॅनल Join करा धन्यवाद. 

Join Whatsapp Channel                                                         Join Whatsapp Group



हे सुद्धा वाचा:- 



शिक्षकेतर कर्मचारी भरती 2026 | 30,000 पदांची मोठी भरती ?
MPSC Saralseva Pariksha 2026: Cadre Bucketing Policy म्हणजे नेमकं काय? उमेदवारांना कसा फायदा होणार?
भूमी अभिलेख विभाग New GR : 10683 Vacancies साठी आकृतीबंध मंजूर खरचं झाला का? पहा संपूर्ण माहिती
सरकारी नोकरभरती MPSC मार्फतच होणार- शासनाची मोठी घोषणा
केंद्रप्रमुख परीक्षा निकाल 2026 जाहीर! 38,558 उमेदवारांचा निकाल प्रसिद्ध – असा करा Result Check
Kolhapur Manapa भरती 2026 | IMP घोषणा रिक्त पदे भरणार
RTO AMVI जाहिरात ..MPSC चे Profile कसे बनवावे? कोणती कागदपत्रे लागतील? Form कोणाच्या नावाने भरावा? पहा संपूर्ण माहिती