नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक मित्रांनो,  puneexamupdate.in वेबसाइटवर आपले स्वागत् आहे या ब्लॉग पोस्ट मध्ये आपण सुप्रीम कोर्टाच्या निर्णयासंबंधात चर्चा करणार आहोत. त्यातील प्रत्येक मुद्दा अत्यंत गरजेचा आहे. हा विषय सुप्रीम कोर्टाच्या ऐतिहासिक निर्णयाशी संबंधित आहे. मी याला थोडक्यात “काहींसाठी आनंद, काहींसाठी निराशा” असेही म्हटले आहे. काही विद्यार्थ्यांना हा निर्णय प्रतिकूल वाटू शकतो, काही जण वेगळ्या पद्धतीने प्रतिक्रिया देऊ शकतात. या ब्लॉग पोस्ट मध्ये प्रत्येक मुद्दा एक एक करून उलगडणार आहे. जर कोणताही मुद्दा समजला नाही तर कमेंटमध्ये लिहा; त्या मुद्द्यावर मी स्पष्टीकरण देईन.

Supreme Court Decision | Open च्या जागा सर्वाना मिळणार का

सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय: विद्यार्थ्यांनी काय समजून घ्यावे?

प्रकरणाची पार्श्वभूमी 
ही केस सुरुवातीला उच्च न्यायालयात दाखल झाली होती. त्यानंतर काही महत्त्वाचे मुद्दे आणि विद्यार्थ्यांची बाजू लक्षात घेऊन तो खटला थेट सुप्रीम कोर्टात गेला.

या प्रकरणात विशेषतः खालील मुद्द्यांवर वाद होता:

  • सुप्रीम कोर्टाने केलेल्या मुख्य टिप्पणी
  • एमपीएससी परीक्षेतील नियम नेमके काय सांगतात
  • शिक्षक भरती 2022 मध्ये काय घडलं आणि ही केस का अडकली
  • TET आणि CTET संदर्भात NCTE काय नियम सांगते
  • उच्च न्यायालयाचा निर्णय आणि सुप्रीम कोर्टाने त्यात केलेला बदल
  • सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय आणि त्यामागील कारणे
  • ओपन आणि कॅटेगरी बाबत झालेले नवे निर्देश
  • 55% आणि 60% मार्क्सबाबतचा अंतिम निपटारा

सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय: शिक्षक भरती प्रक्रियेतील TET आणि TAIT मधील फरक स्पष्ट

शिक्षक भरती प्रक्रियेवर आधारित छाया वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र (2026) या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. हा निर्णय मूलत: शिक्षक भरतीतील दोन मुख्य परीक्षांमधील फरक, त्यांची भूमिका आणि त्यांचे कायदेशीर स्थान स्पष्ट करतो. 2022 पासून सुरू असलेला या मुद्द्यांवरील गोंधळ या निर्णयामुळे संपुष्टात येत आहे.

शिक्षक भरतीची मूळ प्रक्रिया कशी असते?

शिक्षक म्हणून नियुक्त होण्यासाठी उमेदवारांना तीन महत्त्वाच्या पायऱ्यांतून जावे लागते:

TET / CTET – पात्रता परीक्षा

  • डीएड किंवा बीएड पूर्ण केल्यानंतर उमेदवारांनी प्रथम TET किंवा CTET परीक्षा द्यावी लागते.
  • या परीक्षेला पात्रता परीक्षा असे घोषित करण्यात आले आहे.
  • येथे मिळालेल्या गुणांनुसार उमेदवार पात्र (Qualified) ठरतो.
  • ओपन वर्ग: 90 गुण
  • आरक्षित वर्ग: 82 गुण
  • TET म्हणजे शिक्षक भरती प्रक्रियेचे प्रवेशद्वार, परंतु येथे गुणवत्ता ठरत नाही.
TAIT – गुणवत्ता ठरवणारी परीक्षा
  • TET पात्र झाल्यानंतर पुढील पायरी म्हणजे TAIT.
  • हीच ती मुख्य शर्यत जिथे उमेदवारांची गुणवत्तेनुसार निवड केली जाते.
  • TAIT ही गुणवत्ता परीक्षा असून यातील गुण अंतिम निवडीसाठी निर्णायक असतात.
  • या गुणवत्तेनुसार उमेदवार पवित्र पोर्टलवर शिक्षक भरती प्रक्रियेत सामील होऊ शकतात.
अंतिम निवड
  • अंतिम यादी पूर्णतः TAIT मधील गुणवत्तेवर आधारित असते.
  • शासनाने ठरवलेल्या विविध निकषांनुसार उमेदवारांची नियुक्ती केली जाते.

वादाचा मूळ मुद्दा: TET vs TAIT

पूर्ण वाद फक्त या दोन परीक्षांच्या भूमिकांवर आधारित आहे:

  • TET/CTET = पात्रता परीक्षा
  • TAIT = गुणवत्ता परीक्षा

या दोन्ही परीक्षांतील फरक न समजल्यामुळे अनेक वाद, तक्रारी आणि गोंधळ निर्माण झाला होता.

TET आणि TAIT परीक्षांमधील फरक स्पष्ट करणारा संपूर्ण लेख

शिक्षक भरती प्रक्रियेत दोन परीक्षा सर्वात महत्त्वाच्या मानल्या जातात: TET आणि TAIT. दोन्हींचे उद्देश, नियम, पात्रता निकष आणि सवलती यामध्ये मोठा फरक आहे. या फरकांमुळेच छाया वि. राज्य शासन (2026) प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देताना यांचा तपशीलवार विचार केला. खाली दिलेला माहितीपूर्ण विश्लेषण शिक्षक भरतीच्या प्रक्रियेतील या दोन परीक्षांचे स्थान स्पष्ट करतो.

दोन्ही परीक्षांतील फरक: सारांश तक्ता

निकषTET (पात्रता परीक्षा)TAIT (गुणवत्ता परीक्षा)
उद्देशफक्त पात्रता मिळवण्यासाठीअंतिम निवड व गुणवत्ता ठरवण्यासाठी
परीक्षा प्रकारपात्रता (Eligibility Test)मेरिट/गुणवत्ता (Merit Test)
पात्रतेसाठी आवश्यक गुणओपन: 60% (90/150)
राखीव: 55% (82/150)
निश्चित कटऑफ नाही; जास्त गुण मिळवणारा वर
सवलतराखीव प्रवर्गाला 5% सवलतकोणतीही सवलत नाही
नियमसर्वांसाठी समान पात्रता नियम पण गुण वेगळेसर्व उमेदवार समान पायरीवर
अंतिम निवडहोत नाहीTAIT वर आधारित अंतिम निवड

TET मध्ये घेतलेल्या सवलतीमुळे TAIT मधील खुल्या प्रवर्गातील हक्क नाकारले जाण्याचा वाद: स्पष्ट विश्लेषण

शिक्षक भरती प्रक्रियेतील सर्वात मोठा वाद TET आणि TAIT या दोन परीक्षांच्या निकषांवरून निर्माण झाला. विशेषतः राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी TET मध्ये घेतलेल्या सवलतीचा परिणाम TAIT मधील अंतिम गुणवत्ता यादीवर कसा व्हावा, यावर संपूर्ण प्रकरण केंद्रित आहे.

वादाची मूळ कारणे

राखीव प्रवर्गातील उमेदवारांना TET पात्रतेसाठी 5 टक्के सवलत दिली जाते.
त्यामुळे त्यांना TET पात्रता मिळवण्यासाठी 150 पैकी 82 गुण मिळाले तरी ते पात्र होतात. अनेक उमेदवारांनी 82 ते 89 या श्रेणीत गुण मिळवून TET पास केले.

एक महत्त्वाचा उमेदवार उदाहरण म्हणून समोर आला:

  • TET गुण: 82/150 (सवलतीमुळे पात्र).
  • TAIT गुण: 180/200 (उत्कृष्ट, खुल्या प्रवर्गाच्या कटऑफपेक्षा जास्त).
हा उमेदवार TAIT मध्ये खुल्या प्रवर्गाच्या सर्वात वरच्या उमेदवारांपेक्षा अधिक गुण घेऊन आला.
तरीदेखील त्याला खुल्या प्रवर्गातील जागा नाकारण्यात आली.

राज्य सरकारने दिलेले कारण

25 फेब्रुवारी 2024 च्या गुणवत्ता यादीमध्ये सरकारने त्याला खुल्या प्रवर्गासाठी अपात्र ठरवले.
त्यांनी दिलेले मुख्य कारण:

  1. उमेदवाराने TET मध्ये राखीव प्रवर्गाची सवलत घेतली.
  2. म्हणून त्याला "खुल्या प्रवर्गात पात्रतेसाठी आवश्यक असलेले 60% (90 गुण)" नाहीत.
  3. त्यामुळे, TAIT मध्ये कितीही जास्त गुण मिळवले तरी त्याच्यावर खुल्या प्रवर्गाचा विचार करता येणार नाही.
  4. त्याला फक्त राखीव प्रवर्गाच्या जागांसाठी पात्र मानण्यात आले.

यामुळे खुल्या प्रवर्गाच्या जागा, जरी त्याचे गुण सर्वाधिक असले तरी, त्याला मिळू दिल्या नाहीत.

वाद कुठे निर्माण झाला?

येथेच मुख्य तणाव उभा राहिला:

  • TET ही फक्त पात्रता परीक्षा आहे.
  • TAIT ही गुणवत्ता परीक्षा आहे.
  • गुणवत्ता ठरवताना TET मधील सवलत वापरून उमेदवाराला मर्यादित का ठेवावे?
  • TAIT मध्ये ओपनपेक्षा जास्त गुण मिळवूनही उमेदवाराला खुल्या प्रवर्गातून वंचित का ठेवले?

या प्रश्नांवरूनच संपूर्ण प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचले.

TET मध्ये घेतलेल्या सवलतीनंतर TAIT मधील खुल्या प्रवर्गात जाण्याचा हक्क? सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलेले विश्लेषण

शिक्षक भरती प्रक्रियेतील सर्वात गुंतागुंतीचा प्रश्न असा होता की TET ही फक्त पात्रता परीक्षा आहे, तर TAIT ही गुणवत्ता ठरवणारी मुख्य परीक्षा आहे. मग जर एखाद्या राखीव प्रवर्गातील उमेदवाराने TET मध्ये फक्त पात्रतेसाठी सवलत घेतली, तरी त्याला TAIT मध्ये उत्कृष्ट गुण मिळाल्यास तो खुल्या प्रवर्गातील जागेसाठी पात्र ठरू शकतो का? हा नेमका प्रश्न सर्वोच्च न्यायालयात विचारला गेला.

प्रश्न काय विचारला गेला?

जर उमेदवाराने पात्रता परीक्षेत (TET) सवलत घेतली असेल तर, मुख्य परीक्षा (TAIT) मध्ये जास्त गुण मिळाल्यावर तो खुल्या प्रवर्गात जाऊ शकतो का?

यालाच स्थलांतर किंवा Migration to Open Category असा मुद्दा कोर्टाने संबोधला.

कोर्टाने संदर्भ म्हणून MPSC चे नियमही पाहिले

तत्पूर्वी कोर्टाने MPSC चा नियम तपासण्यासाठी उदहरण म्हणून घेतला: 

MPSC मधील पूर्व परीक्षा 
  • पूर्व परीक्षा होते
  • मुख्य परीक्षा
  • मुलाखत

पूर्व परीक्षा ही चाळणी परीक्षा असते. ती पात्रता परीक्षा नसते.

MPSC चे दोन नियम

जर कॅटेगरी उमेदवाराने पूर्व परीक्षेत ओपनचा कटऑफ पार केला:

  • मुख्य परीक्षा: ओपन + कॅटेगरी
  • मुलाखत: ओपन + कॅटेगरी
  • अंतिम निवड: दोन्हीचा विचार

जर उमेदवार पूर्व परीक्षेत फक्त कॅटेगरीमधूनच गेला तर पुढे सर्व टप्प्यात त्याचा विचार फक्त कॅटेगरीसाठीच होतो. परंतु हे मॉडेल शिक्षक भरतीला लागू करता येणार नाही, कारण TET ही चाळणी परीक्षा नाही. ती पात्रता परीक्षा आहे. कोर्टाने स्पष्ट केले: MPSC चा नियम शिक्षक भरतीला लागू होत नाही.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेला स्पष्ट निर्णय: TET मध्ये घेतलेली सवलत TAIT मधील गुणवत्तेला रोखू शकत नाही

शिक्षक भरतीतील सर्वात महत्त्वाचा आणि वर्षानुवर्षे गोंधळ निर्माण करणारा मुद्दा म्हणजे TET मध्ये घेतलेल्या 5% सवलतीमुळे TAIT मधल्या खुल्या प्रवर्गातील जागांवर हक्क मिळतो का नाही? याच प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय आता संपूर्ण प्रक्रिया स्पष्ट करून टाकतो. चला हा मुद्दा सरळ आणि स्पष्टपणे समजून घेऊया.

TET मधील गुण: 82–89 विरुद्ध 90+ 
  • 82–89 गुण = 55% हे राखीव प्रवर्गातील उमेदवार (SC, ST, OBC, EWS इत्यादी) पात्रता सवलतीत पास झालेले.
  • 90 गुण = 60% हे खुल्या प्रवर्गात पात्र ठरलेले.
वाद हाच होता की “पात्रता परीक्षेत सवलत घेतली म्हणून TAIT मध्ये जास्त गुण मिळूनही ओपनमध्ये जाता येत नाही का?”

समस्या काय निर्माण झाली?

2022 च्या भरतीमध्ये आश्चर्याची गोष्ट अशी घडली की, राखीव प्रवर्गाच्या उमेदवारांचा TAIT कटऑफ ओपनपेक्षा जास्त लागला त्यांना TAIT मध्ये ओपनपेक्षा जास्त गुण मिळाले तरीही ओपनच्या जागा त्यांना मिळु शकल्या नाहीत, यामुळे प्रश्न उपस्थित झाला TET पात्रता परीक्षा आहे. मग पात्रतेतील सवलत TAIT मधील गुणवत्ता का रोखते?

उच्च न्यायालयाचा निकाल (High Court)

उच्च न्यायालयाने आधी दिलेला निष्कर्ष असा होता, TET सवलतीमुळे उमेदवाराला अवाजवी फायदा मिळतो
म्हणून Migration to Open Category (ओपनमध्ये स्थलांतर) नाकारले. यासाठी त्यांनी प्रदीप कुमार केस दाखल करीत चुकीचा संदर्भ दिला.

सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप केला आणि निर्णय उलटवला

सर्वोच्च न्यायालयाने थेट उच्च न्यायालयाचा निर्णय बदलला आणि अत्यंत स्पष्ट तर्क दिला. TET आणि TAIT दोन्ही वेगळ्या परीक्षा. 
  • TET = पात्रता परीक्षा (Eligibility)
  • TAIT = गुणवत्ता परीक्षा (Merit)
या दोन परीक्षा एकमेकांना गोंधळवून बघता येत नाहीत.

Level Playing Field — समान पातळीचा सिद्धांत:- TAIT ही सर्वांसाठी समान स्पर्धा आहे. इथे कोणालाही सवलत मिळत नाही. सर्व जण एकाच पातळीवर स्पर्धा करतात.

5% सवलतीचा उद्देश काय?

कोर्ट म्हणाले: “5% सवलतीचा उद्देश हा फक्त रिंगणात प्रवेश देणे आहे. मुख्य स्पर्धा TAIT मध्येच ठरते.” सवलत म्हणजे अतिरिक्त गुण नाहीत. TAIT मध्ये कोणालाही एक्स्ट्रा मार्क मिळत नाही.

सुप्रीमसी ऑफ Merit — गुणवत्ता सर्वोच्च

खुला प्रवर्ग कुठल्याही जातीसाठी राखीव नाही. तो पूर्णपणे गुणवत्तेवर आधारित आहे. जर राखीव प्रवर्गातील उमेदवाराने TAIT मध्ये ओपनपेक्षा जास्त गुण मिळवले तर त्याचा ओपन सीटवर नैसर्गिक हक्क आहे हे न्यायालयाने स्पष्ट शब्दांत सांगितले.

योग्य संदर्भ: विकास सांखला केस

या खटल्यात NCTE ने सांगितले होते:

  1. TET मध्ये सवलत घेणे कायदेशीर आहे
  2. आणि ती सवलत फक्त पात्रतेपुरती आहे
  3. पुढील गुणवत्ता परीक्षेत तिचा कोणताही परिणाम होत नाही
सर्वोच्च न्यायालय म्हणते: हा नियम महाराष्ट्र शिक्षक भरतीला पूर्णपणे लागू आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय: शिक्षक भरतीतील सवलतीचा हक्क आणि ओपन कटऑफवरील स्पष्टता

शिक्षक भरती प्रक्रियेत 2022 पासून सुरु असलेला गोंधळ, विशेषतः TET सवलत, ओपन कटऑफ, आणि कॅटेगरी आरक्षण याबाबत अनेक उमेदवारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर अखेर सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला आहे. हा निर्णय पुढील काळातील सर्व भरती प्रक्रियेचे स्वरूप बदलणारा ठरणार आहे.

मुख्य मुद्दा: 82–89 गुण वि. 90 गुण

2022 शिक्षक भरतीमध्ये मोठा प्रश्न उद्भवला होता. 82–89 गुण मिळवलेल्या कॅटेगरी उमेदवारांना पात्रता मिळाली होती (5% सवलतीमुळे). 90 गुण मिळवलेल्यांनाच 60% निकष पूर्ण झाल्याचे मानले जात होते. काही प्रकरणात कॅटेगरी उमेदवारांचे गुण जास्त असतानासुद्धा त्यांना हव्या जागा मिळाल्या नाहीत. उलट ओपन प्रवर्गाचा कटऑफ कमी लागला आणि अनेक गुणवान कॅटेगरी उमेदवार ओपनमध्ये बसू शकले नाहीत. यामुळे प्रश्न उपस्थित झाला होता. TET मधील सवलत ओपन प्रवर्गातील स्पर्धेला बाधा आणते का?

उच्च न्यायालयाचा निकाल व सर्वोच्च न्यायालयाचा हस्तक्षेप

उच्च न्यायालयाने आधीच्या प्रदीप कुमार खटल्याचा संदर्भ देत सवलत घेतलेल्यांना ओपनमध्ये संधी न देण्याचे मत व्यक्त केले होते. परंतु सर्वोच्च न्यायालयाने हा संदर्भ चुकीचा असल्याचे सांगत उच्च न्यायालयाचा निकाल रद्द केला.

सर्वोच्च न्यायालयाचे तर्क व स्पष्ट भूमिका

TET आणि TAT या दोन वेगळ्या परीक्षा 
  • TET फक्त पात्रता परीक्षा आहे.
  • TAT/मुख्य परीक्षा ही गुणवत्ता परीक्षा आहे 
  • प्रवेशासाठी दिलेली 5% सवलत गुणवत्तेच्या परीक्षेत कोणताही जादा फायदा देत नाही.
 समान पातळीचा सिद्धांत (Level Playing Field) :- मुख्य परीक्षेत कुणालाही सवलत नाही. म्हणून सर्वांची स्पर्धा एकसमान आहे.

गुणवत्ता सर्वोच्च (Merit is supreme):- खुला प्रवर्ग कोणत्याही जातीसाठी राखीव नसतो. कॅटेगरी उमेदवारांनी जास्त गुण मिळवले असतील तर, त्यांचा ओपन प्रवर्गावर नैसर्गिक हक्क आहे.

योग्य संदर्भ: विकास सांखला खटला:- या खटल्यातील नियम महाराष्ट्र शिक्षक भरतीला लागू होतात. TET मधील 5% सवलत पूर्णपणे कायदेशीर आहे.

अंतिम निर्णय: सर्वोच्च न्यायालयाने काय आदेश दिला?

निष्कर्ष

उच्च न्यायालयाचा निकाल रद्द. सवलत घेतलेल्या पण मुख्य परीक्षेत जास्त गुण मिळवलेल्या सर्व उमेदवारांना ओपन गुणवत्ता यादीत समाविष्ट करा. प्रवेशासाठी दिलेली सवलत ओपन स्पर्धेतील हक्क हिरावू शकत नाही.

सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की TET मधील 5% सवलत फक्त पात्रता मिळवण्यासाठी आहे, गुणवत्तेच्या (TAT/मुख्य परीक्षा) निकालावर किंवा ओपन स्पर्धेवर तिचा कोणताही परिणाम होत नाही. गुणवत्ता परीक्षा सर्वांसाठी समान आहे.

त्यामुळे:

  1. कॅटेगिरी उमेदवारांनी मुख्य परीक्षेत जास्त गुण मिळवले असल्यास त्यांना ओपन प्रवर्गातील जागांवर पूर्ण हक्क आहे.
  2. सवलत घेतली म्हणून त्यांचा ओपनमधील हक्क काढून घेऊ शकत नाही.
  3. गुणवत्ता सर्वोच्च आहे, जात नाही.
  4. उच्च न्यायालयाचा निर्णय चुकीचा ठरवून सर्वोच्च न्यायालयाने तो रद्द केला.
  5. भविष्यातील सर्व भरती प्रक्रियेत हा नियम लागू राहील.
  6. 2022 ची भरती यादी रिवाईज करण्याबाबत कोर्टाने कोणताही आदेश दिलेला नाही.

थोडक्यात:
TET सवलत प्रवेशासाठी, पण स्पर्धा आणि निवड पूर्णपणे गुणवत्तेवरच.

अशा महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे टेलिग्राम आणि व्हॉट्स अॅप चॅनल Join करा धन्यवाद. 

Join Whatsapp Channel                                                         Join Whatsapp Group



हे सुद्धा वाचा:- 










शिक्षकेतर कर्मचारी भरती 2026 | 30,000 पदांची मोठी भरती ?
MPSC Saralseva Pariksha 2026: Cadre Bucketing Policy म्हणजे नेमकं काय? उमेदवारांना कसा फायदा होणार?
भूमी अभिलेख विभाग New GR : 10683 Vacancies साठी आकृतीबंध मंजूर खरचं झाला का? पहा संपूर्ण माहिती
सरकारी नोकरभरती MPSC मार्फतच होणार- शासनाची मोठी घोषणा
केंद्रप्रमुख परीक्षा निकाल 2026 जाहीर! 38,558 उमेदवारांचा निकाल प्रसिद्ध – असा करा Result Check
Kolhapur Manapa भरती 2026 | IMP घोषणा रिक्त पदे भरणार
RTO AMVI जाहिरात ..MPSC चे Profile कसे बनवावे? कोणती कागदपत्रे लागतील? Form कोणाच्या नावाने भरावा? पहा संपूर्ण माहिती