नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, puneexamupdate.in वर आपले स्वागत आहे. महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल 2 May 2026 ला जाहीर झाला आणि आता सगळ्या दहावीच्या विद्यार्थ्यांना एकच प्रश्न आहे — "आमचा SSC निकाल कधी लागणार?" तर या प्रश्नाचं उत्तर आज आपण सविस्तर बघणार आहोत.

Maharashtra SSC Result 2026

SSC Result 2026 कधी येणार?

मागील तीन वर्षांचा इतिहास बघितला तर एक गोष्ट clearly दिसते — बारावीचा निकाल लागल्यानंतर साधारण 7 दिवसांनी दहावीचा निकाल जाहीर होतो. यंदा बारावीचा निकाल 2 May 2026 ला लागला — त्यामुळे दहावीचा निकाल 10 May ते 15 May 2026 दरम्यान कधीही जाहीर होऊ शकतो.

SSC Results मागील 3 वर्षांचा इतिहास

 
वर्ष12वी निकाल10वी निकालफरक
20255 May13 May8 दिवस
202421 May27 May6 दिवस
202325 May2 June7 दिवस

तिन्ही वर्षी 6 ते 8 दिवसांचं अंतर राहिलेलं आहे. यंदा पण हाच pattern follow होण्याची शक्यता आहे — त्यामुळे 10 May ते 15 May हा कालावधी लक्षात ठेवा.

SSC Result 2026 निकाल येण्याआधी काय होतं?

निकाल जाहीर होण्याच्या एक दिवस आधी Maharashtra Board कडून:
  • एक Official Notification PDF जारी केली जाते.
  • अधिकृत website वर Countdown Timer सुरू केला जातो.
  • बातम्यांमध्ये result date officially announce होते.

त्यामुळे निकालाच्या एक दिवस आधीच तुम्हाला कळेल घाबरण्याची गरज नाही!

SSC Result 2026 निकाल कुठे बघायचा?

Maharashtra SSC Result 2026 खालील websites वर उपलब्ध होईल:

  1. mahresult.nic.in ← सगळ्यात पहिलं इथे येतो
  2. mahahsscboard.maharashtra.gov.in
  3. results.gov.in

याशिवाय DigiLocker App आणि UMANG App वर पण result बघता येतो website slow असेल तर या apps वापरा.

SSC Result कसा बघायचा? Step-by-Step

  1. mahresult.nic.in उघडा
  2. "SSC Result 2026" link वर click करा
  3. तुमचा Seat Number टाका
  4. Mother's First Name टाका (Hall Ticket प्रमाणे)
  5. Submit करा — तुमचा Result दिसेल
  6. Result Download करा आणि Print काढून ठेवा

SSC Resukt Website Slow असेल तर काय करायचं?

निकालाच्या दिवशी लाखो students एकाच वेळी website उघडतात त्यामुळे server slow होतो. अशा वेळी:
  • थोडा वेळ थांबा आणि परत try करा
  • DigiLocker App वापरा - इथे server load कमी असतो
  • UMANG App वर login करा → Maharashtra Board services → SSC Result

Passing Marks किती लागतात?

Maharashtra SSC Board मध्ये pass होण्यासाठी प्रत्येक subject मध्ये किमान 35 गुण आवश्यक आहेत. एखाद्या subject मध्ये कमी गुण मिळाले तर Compartment Exam ची संधी मिळते.

SSC Result नंतर काय करायचं?

  • Result Download करा आणि Print काढा.
  • Marksheet जपून ठेवा college admission साठी लागेल.
  • 11वी Admission 2026 साठी लवकरच process सुरू होईल puneexamupdate.in वर लक्ष ठेवा.

निष्कर्ष 

मित्रांनो, आता फक्त काही दिवसांची प्रतीक्षा आहे — 10 May ते 15 May 2026 दरम्यान तुमचा निकाल नक्की जाहीर होईल. घाबरू नका, शांत राहा आणि Best of Luck! अशाच महत्त्वाच्या updates साठी puneexamupdate.in ला Bookmark करा आणि तुमच्या मित्रांना पण share करा!

Read More










शिक्षकेतर कर्मचारी भरती 2026 | 30,000 पदांची मोठी भरती ?
MPSC Saralseva Pariksha 2026: Cadre Bucketing Policy म्हणजे नेमकं काय? उमेदवारांना कसा फायदा होणार?
भूमी अभिलेख विभाग New GR : 10683 Vacancies साठी आकृतीबंध मंजूर खरचं झाला का? पहा संपूर्ण माहिती
सरकारी नोकरभरती MPSC मार्फतच होणार- शासनाची मोठी घोषणा
केंद्रप्रमुख परीक्षा निकाल 2026 जाहीर! 38,558 उमेदवारांचा निकाल प्रसिद्ध – असा करा Result Check
Kolhapur Manapa भरती 2026 | IMP घोषणा रिक्त पदे भरणार
RTO AMVI जाहिरात ..MPSC चे Profile कसे बनवावे? कोणती कागदपत्रे लागतील? Form कोणाच्या नावाने भरावा? पहा संपूर्ण माहिती