नमस्कार मित्रांनो, puneexamupdate.in वर आपले स्वागत आहे. MPSC Combine Group B 2026 ची जाहिरात आली आहे आणि 552 पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना फॉर्म कसा भरायचा हे माहीत नसते आणि छोट्या चुकांमुळे अर्ज Reject होतो. त्यामुळे आज आपण संपूर्ण Step-by-Step Process बघणार आहोत. तसेच तुम्हाला जर mpsc परीक्षेसंबंधीत महत्वपूर्ण नोट्स आणि पुस्तके हवी असतील तर त्या वर ही आपल्या ब्लॉग पोस्ट बनवलेल्या आहेत, वेबसाइट वर आल्यानंतर सर्च बार च्या मदतीने aricles शोधून नोट्स आणि पुस्तके download करा.
MPSC Group B 2026 फॉर्म कसा भरावा? | Step-by-Step संपूर्ण Process | mpsconline.gov.in

MPSC Group B 2026 फॉर्म भरण्यापूर्वी हे करा

फॉर्म भरायला सुरुवात करण्यापूर्वी तुमचं MPSC Profile तयार असणं आवश्यक आहे. Profile नसेल तर आधी mpsconline.gov.in वर जाऊन New User Registration करा. Profile आधीच बनवलेलं असेल तर Login करा.

महत्त्वाचं: Login ID किंवा Password विसरलो असेल तर "Forgot/Reset Password" option वापरा.
Step 1 :- MPSC Website वर Login करा
  • mpsconline.gov.in उघडा
  • Online Facility --> Online Application System वर click करा
  • तुमचा ID आणि Password टाका
  • Captcha भरा आणि Login करा

Step 2 :- Eligibility Check करा

  1. Login केल्यानंतर Online Application वर click करा. इथे तुम्हाला सध्या available असलेल्या सगळ्या जाहिराती दिसतात. Group B ची जाहिरात (Advt. No. 104/2026) शोधा आणि "View" वर click करा.
  2. View केल्यानंतर जाहिरातीची सगळी माहिती दिसते last date, process वगैरे. आता "Check Eligibility" वर click करा.
  3. इथे दोन results येऊ शकतात:
  4. "You are Eligible and Can Apply for this Post"  हिरव्या रंगात दिसलं तर तुम्ही eligible आहात, पुढे जा.
  5. "You are Not Eligible" हे आलं तर घाबरू नका. My Account मध्ये जाऊन Profile Unlock करा, माहिती चेक करा, Update करा, Save करा, Lock करा आणि परत Check Eligibility करा.

Step 4 :-  Apply करा

  • Profile तपासल्यानंतर जाहिरातीच्या बॉक्सवर Tick करा आणि "Apply" वर click करा. Apply केल्यानंतर Payment Page उघडतं.
  • जर Apply करून सोडून दिलं आणि Payment केलं नाही तर पुढच्या वेळी Login केल्यावर "Fees Not Paid" असा option दिसेल तिथून "Pay Now" करता येतं.

Step 5 :- Payment करा

Payment साठी दोन पर्याय आहेत:
Online Payment:
  1. Select Payment Method --> Online Payment --> OK
  2. SBI किंवा EazyPay - दोन्हींपैकी एक निवडा
  3. Debit Card, Credit Card किंवा Net Banking वापरून Payment करा
  4. Card चं नाव, Expiry Date, CVV number टाका आणि Pay Now करा

Offline Payment (SBI Challan):

  1. Challan Online Generate करा
  2. कोणत्याही SBI Branch मध्ये जाऊन Challan Generate केल्यापासून 3 तासांच्या आत Payment करा
Step 6 :- Payment Confirm झाल्यावरच Logout करा
  • Payment केल्यानंतर लगेच Logout करू नका! थांबा आणि बघा "Fees Paid" हा option हिरव्या रंगात आला की मग Logout करा.
  • हे दिसलं नाही तर थोडा वेळ थांबा काही मिनिटांनी update होतं. हे confirm झाल्यावरच तुमचा अर्ज यशस्वीरित्या submit झाला असं समजा.
अर्ज केल्यानंतर हे करा
  • अर्जाची Print काढून ठेवा
  • Payment Receipt save करा
  • Search Console... अर्थात mpsconline.gov.in वर Login करून Application Status check करत राहा

MPSC Group B 2026 महत्त्वाच्या तारखा

कार्यक्रमतारीख
अर्ज सुरू10 April 2026
अर्जाची शेवटची तारीख30 April 2026
SBI Challan Last Date4 May 2026
Prelims परीक्षा14 June 2026

निष्कर्ष 

मित्रांनो, फॉर्म भरताना घाई करू नका. Profile मधली प्रत्येक माहिती दोनदा तपासा — एक छोटी चूक पण भविष्यात मोठी अडचण निर्माण करू शकते. वेळेत अर्ज करा आणि तयारीला लागा!
अशाच महत्त्वाच्या MPSC अपडेट्ससाठी puneexamupdate.in ला Bookmark करा.

Read More










शिक्षकेतर कर्मचारी भरती 2026 | 30,000 पदांची मोठी भरती ?
MPSC Saralseva Pariksha 2026: Cadre Bucketing Policy म्हणजे नेमकं काय? उमेदवारांना कसा फायदा होणार?
भूमी अभिलेख विभाग New GR : 10683 Vacancies साठी आकृतीबंध मंजूर खरचं झाला का? पहा संपूर्ण माहिती
सरकारी नोकरभरती MPSC मार्फतच होणार- शासनाची मोठी घोषणा
केंद्रप्रमुख परीक्षा निकाल 2026 जाहीर! 38,558 उमेदवारांचा निकाल प्रसिद्ध – असा करा Result Check
Kolhapur Manapa भरती 2026 | IMP घोषणा रिक्त पदे भरणार
RTO AMVI जाहिरात ..MPSC चे Profile कसे बनवावे? कोणती कागदपत्रे लागतील? Form कोणाच्या नावाने भरावा? पहा संपूर्ण माहिती