×
Join Now For Quick Update
WhatsApp Channel WhatsApp Group

MPSC Group C जाहिरात 2026: अभ्यासक्रम पुनरावलोकनासाठी तज्ञ समिती गठित — जाहिरात यायला अजून तीन महिने लागणार?

महत्त्वाचे परिपत्रक काय आहे? 

महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाने 12 जून 2026 रोजी एक महत्त्वाचे परिपत्रक जारी केले आहे. हे परिपत्रक महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन (MITRA) यांच्याकडून आले असून त्याचा विषय आहे - "महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासक्रमाच्या पुनरावलोकनासाठी तज्ञ समिती गठित करणे." 5 मे 2026 रोजी राज्य शासनाने एक महत्त्वाचा GR (शासन निर्णय) काढला होता. त्यामध्ये गट-क (Group C) मधील अनेक पदे MPSC कडे हस्तांतरित करण्यात आली. त्यामुळे आता MPSC ला या नव्या पदांसाठी परीक्षा पद्धत, अभ्यासक्रम आणि निवड प्रक्रिया नव्याने निश्चित करावी लागणार आहे. त्याचसोबत बदलत्या शैक्षणिक व व्यावहारिक गरजांच्या अनुषंगाने अभ्यासक्रम अद्यावत करणे आवश्यक असल्याने ही समिती स्थापन करण्यात आली आहे.

MPSC Group C जाहिरात 2026: अभ्यासक्रम पुनरावलोकनासाठी तज्ञ समिती गठित — जाहिरात यायला अजून तीन महिने लागणार?

MPSC Group C जाहिरात 2026 - तज्ञ समितीची रचना

या समितीमध्ये एकूण सात तज्ञ सदस्य असणार आहेत:
पदसदस्य
अध्यक्ष-डॉ. प्रवीण परदेशी (मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार व CEO, MITRA)
सदस्य-डी. के. जैन
सदस्य-डॉ. रघुनाथ माशेलकर (प्रसिद्ध शास्त्रज्ञ)
सदस्य-संजय बेलसारे
सदस्य--डॉ. उमाकांत दांगडे
सदस्यशेखर गायकवाड (साखर आयुक्त)
सदस्य सचिव-अमन मित्तल

समितीचे कार्यक्षेत्र — कोणत्या परीक्षांचा समावेश?

या समितीद्वारे खालील सर्व गटांच्या परीक्षांचे पुनरावलोकन केले जाणार आहे:
  • गट-अ (Group A) — राज्यसेवा व इतर गट-अ पदे (आधी 6 सेवा होत्या, आता 24 झाल्या आहेत)
  • गट-ब राजपत्रित (Group B Gazetted)
  • गट-ब अराजपत्रित (Group B Non-Gazetted) — PSI, STI, ASO सह
  • गट-क (Group C) — सरळ सेवेची सर्व पदे

समिती नेमके काय करणार?

  1. सर्व परीक्षांच्या विद्यमान अभ्यासक्रमांचे सर्वसमावेशक पुनरावलोकन करणे
  2. संबंधित विषयातील तज्ञांशी विचारविनिमय करणे
  3. कालबाह्य विषय बदलून नवीन तांत्रिक, प्रशासकीय व समकालीन घडामोडींशी संबंधित विषयांचा समावेश सुचवणे
  4. सुधारित अभ्यासक्रमासह सविस्तर शिफारस अहवाल MPSC कडे सादर करणे

MPSC Group C  जाहिरात कधी येणार? - तीन महिन्यांचा कालावधी

परिपत्रकात स्पष्टपणे नमूद आहे की -"समिती आपला अंतिम अहवाल या आदेशाच्या दिनांकापासून तीन महिन्यांच्या आत सादर करेल." म्हणजेच 12 जून 2026 पासून तीन महिने - अंदाजे सप्टेंबर 2026 पर्यंत हा अहवाल MPSC कडे येणे अपेक्षित आहे. त्यानंतर MPSC परीक्षा पद्धत व अभ्यासक्रम जाहीर करेल आणि मगच जाहिरात येऊ शकते. आवश्यक असल्यास CEO, MITRA यांच्या मान्यतेने मुदतवाढही देता येईल.

उमेदवारांनी काय करावे?

अभ्यासक्रमात बदल होणार असला तरी MPSC च्या मूळ अभ्यासाचा पाया कायम राहणार आहे. त्यामुळे -

  • अभ्यास थांबवू नका — तीन महिन्यांत बरेच काही स्पष्ट होईल
  • सध्याच्या अभ्यासक्रमानुसार तयारी सुरू ठेवा
  • MPSC च्या अधिकृत वेबसाइटवर mpsc.gov.in नियमित अपडेट तपासत राहा
  • जाहिरात अचानक आली तरी तयार राहणे हेच शहाणपण आहे
तपशीलमाहिती
परिपत्रक तारीख12 जून 2026
जारी केलेलेMITRA (महाराष्ट्र नियोजन विभाग)
उद्देशMPSC परीक्षा अभ्यासक्रम पुनरावलोकन
समिती सदस्य7 तज्ञ
समाविष्ट गटगट-अ, गट-ब, गट-क
अहवाल सादर करण्याची मुदत3 महिने (सप्टेंबर 2026 पर्यंत)
Group C जाहिरात अपेक्षितसप्टेंबर 2026 नंतर

निष्कर्ष

MPSC Group C जाहिरातीची प्रतीक्षा करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी हे परिपत्रक महत्त्वाचे आहे. तज्ञ समितीला अहवाल सादर करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आला असल्याने Group C जाहिरात लगेच येणे अपेक्षित नाही. मात्र हा काळ तयारीसाठी सोन्याची संधी आहे — अभ्यास सुरू ठेवा, अपडेट तपासत राहा आणि जाहिरात आली की तयार असा.

Read More 










शिक्षकेतर कर्मचारी भरती 2026 | 30,000 पदांची मोठी भरती ?
MPSC Saralseva Pariksha 2026: Cadre Bucketing Policy म्हणजे नेमकं काय? उमेदवारांना कसा फायदा होणार?
भूमी अभिलेख विभाग New GR : 10683 Vacancies साठी आकृतीबंध मंजूर खरचं झाला का? पहा संपूर्ण माहिती
सरकारी नोकरभरती MPSC मार्फतच होणार- शासनाची मोठी घोषणा
केंद्रप्रमुख परीक्षा निकाल 2026 जाहीर! 38,558 उमेदवारांचा निकाल प्रसिद्ध – असा करा Result Check
Kolhapur Manapa भरती 2026 | IMP घोषणा रिक्त पदे भरणार
RTO AMVI जाहिरात ..MPSC चे Profile कसे बनवावे? कोणती कागदपत्रे लागतील? Form कोणाच्या नावाने भरावा? पहा संपूर्ण माहिती

Previous Post Next Post

Contact Form